Saturday 21 March 2015

सुविचार

1)   सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.सुविचार

2)   आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.सुविचार

3)   प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.सुविचार

4)   जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.सुविचार

5)   यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.सुविचार

6)   प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.सुविचार

7)   ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.सुविचार

8)   यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.सुविचार

9)   प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !सुविचार

10)  चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !सुविचार


11)  मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.सुविचार

12)  छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.सुविचार

13)  आपण जे पेरतो तेच उगवतं.सुविचार

14)  फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.सुविचार

15)  उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.सुविचार

16)  शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.सुविचार

17)  प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.सुविचार

18)  आधी विचार करा, मग कृती करा.सुविचार

19)  आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.सुविचार

20)  फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !सुविचार

21)  आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.सुविचार

22)  बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?सुविचार

23)  कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !सुविचार

24)  टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.सुविचार

25)  नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.सुविचार

26)  यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.सुविचार

27)  आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.सुविचार

28)  खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.सुविचार

29)  जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.सुविचार

30)  प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.सुविचार

31)  स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.सुविचार

32)  आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.सुविचार

33)  माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.सुविचार

34)  जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.सुविचार

35)  तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.सुविचार

36)  शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.सुविचार

37)  हसा, खेळा पण शिस्त पाळा.सुविचार

38)  आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.सुविचार

39)  स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.सुविचार

40)  तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !सुविचार

41)  एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.सुविचार

42)  अतिथी देवो भव ॥सुविचार

43)  अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.सुविचार

44)  दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.सुविचार

45)  आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.सुविचार

46)  निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.सुविचार

47)  खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.सुविचार

48)  उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.सुविचार

49)  चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.सुविचार

50)  नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.सुविचार

51)  माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.सुविचार

52)  सत्याने मिळतं तेच टिकतं.सुविचार

53)  जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.सुविचार

54)  परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.सुविचार

55)  हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !सुविचार

56)  स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.सुविचार

57)  प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.सुविचार

58)  खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.सुविचार

59)  तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.सुविचार

60)  वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

61)  जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

62)  गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.सुविचार

63)  झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.सुविचार

64)  माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.सुविचार

65)  क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.सुविचार

66)  सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.सुविचार

67)  मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.सुविचार

68)  आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.सुविचार

69)  बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.सुविचार

70)  मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.सुविचार

71)  तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.सुविचार

72)  शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.सुविचार

73)  मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.सुविचार

74)  आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.सुविचार

75)  एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.सुविचार

76)  परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !सुविचार

77)  खिडकी म्हणजे आकाश नसतं.सुविचार

78)  जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.सुविचार

79)  वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.सुविचार

80)  भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते. 

81)  तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.सुविचार

82)  सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.सुविचार

83)  काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.सुविचार

84)  लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.सुविचार

85)  चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.सुविचार

86)  तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.सुविचार

87)  भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.सुविचार

88)  चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.सुविचार

89)  आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.सुविचार

90)  उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.सुविचार

91)  पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.सुविचार

92)  अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.सुविचार

93)  मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.सुविचार

94)  संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.सुविचार

95)  रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !सुविचार

96)  अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.सुविचार

97)  अंथरूण बघून पाय पसरा.सुविचार

98)  कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.सुविचार

99)  तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.सुविचार

100)     अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.सुविचार 

101)     सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.सुविचार

102)     सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.सुविचार

103)     शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥सुविचार

104)     सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.सुविचार

105)     विद्या विनयेन शोभते ॥सुविचार

106)     शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.सुविचार

107)     जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.सुविचार

108)     एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.सुविचार

109)     कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.सुविचार

110)     आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.सुविचार

111)     ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.सुविचार

112)     कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.सुविचार

113)     देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !सुविचार

114)     आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.सुविचार

115)     मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !सुविचार

116)     ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.सुविचार

117)     जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.सुविचार

118)     आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.सुविचार

119)     रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.सुविचार

120)     जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

No comments:

Post a Comment